Share

‘कोरोनावरील लस सुरक्षितच, संकोच बागळू नका’

Published On: 

नवी दिल्ली: देशात कोरोनावर मात करण्यासाठी १६ जानेवारीला कोरोना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. यावेळी कोरोन काळामध्ये अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. देशासाठी आपल्या जीवाची पर्वा न करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले काम निरंतर सुरु ठेवले होते. या पार्श्वभूमीवर त्यांना पहिले लास देण्यात येणार आहे.

मात्र, काही कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी नकार दिला आहे. कारण; लस सुरक्षित नसल्याची भावना मनात असल्याने काही जण नकार देत आहेत. मात्र, लस पूर्णत: सुरक्षित असून संकोच बाळगू नका, असे आवाहन आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी केले आहे. कोरोना लस परिणामकारण आणि सुरक्षित आहे. लसीचे काही दुष्पपरिणाम आणि प्रतिकूल परिणाम सामान्य आहेत. कोणतीही लस घेतल्यानंतर ही साधारण लक्षणे दिसून येतात. असे देखील त्यांनी सांगितले. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी लस हाच एकमेव पर्याय आहे. काही जण राजकीय फायद्यासाठी लसीबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे काही व्यक्तींच्या मनात लसीबाबत संकोच निर्माण आहे. असे मत डॉ हर्षवर्धन यांनी व्यक्त केले.

भारतामध्ये १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सीरम कंपनीची कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिन लसीला आणीबाणीच्या काळात वापरासाठी परवाना देण्यात आला आहे. लसीचा डोस घेतल्यानंतर काही व्यक्तींमध्ये दुष्परिणाम दिसून आले आहेत. तर दोन व्यक्तींचा मृत्यूही झाला आहे. मात्र, हे मृत्यू लसीकरणाशी संबधित नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. भारत बायोटेक कंपनीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल आले नसल्यानेही अनेकांनी लस घेण्यास नकार दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!