Share

भारतात लहान मुलांसाठी कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता

Published On: 

नवी दिल्ली- केंद्र सरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींच्या 44 कोटी 53 लाख मात्रांचा पुरवठा केला आहे. याशिवाय आणखी सुमारे 85 लाख 58 हजार मात्रा लवकरच वितरित केल्या जाणार असल्याचं केद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. देशभर कोविड-19 लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असून त्या दिशेनं जलदगतीनं काम सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भारतात लहान मुलांसाठी कोव्हिड प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे की झायडसच्या या लसींच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आणि या लसीच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळण्याची वाट ते पाहात आहेत. तर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीच्या चाचण्या ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत पूर्ण होतील आणि तोपर्यंत या लसीला मान्यता मिळेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

फायजरच्या लसींच्या लहान मुलांसाठीच्या वापराची परवानगी अमेरिकेच्या लस नियंत्रकांनी दिली आहे. भारतामध्ये लहान मुलांचं लसीकरण सुरु झाल्यानंतर कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यास याची खूप मदत होईल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!