नवी दिल्ली: देशभरात कोरोन संक्रमण कमी होत आहे, तसेच देशभरात लसीकरणाचा वेग अधिक असल्याचे विधान नरेंद्र मोदी यांनी केले. मात्र परिस्थिती काही वेगळीच असल्याचे कॉंग्रेसने स्पष्ट केले आहे. कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर माध्यमावर मोदींचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये कॉंग्रेसने कोरोन व्हायरसचे आकडे निर्देशित केले आहे.
देशात आतापर्यंत फक्त ११ करोड नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तर बिहार सारख्या भागात गेल्या १५ दिवसांपासून लसीकरण बंद आहे. लसीचा पुरवठा न झाल्याने देशातील बऱ्याच भागातील लसीकरण सध्या ठप्प झाले आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान सर्वाना मोफत लस धोरणाचा प्रचार करत आहेत. मात्र परिस्थिती याच्या पूर्णतः विरोधी असल्याचे चित्र आज भारतात आहे. असे मत कॉंग्रेसने ट्विटमधून व्यक्त केले आहे.
मोदी जी, वायरस संक्रमण सिर्फ बातों से नियंत्रित नहीं होगा। उसके लिए जरूरी है वायरस को रोकने के लिए प्रभावी कदम उठाए जाएं, टीकाकरण की दर बढ़ाई जाए, स्वास्थ्य संरचना में सुधार किया जाए। pic.twitter.com/5hpX44XPvU
— Congress (@INCIndia) August 8, 2021
केवळ घोषणा किवा बोलण्याने कोरोना संक्रमण नियंत्रणात येणार नाही, तर देशात लसीकरणाचा वेग वाढणे गरजेचे आहे. सर्वांपर्यंत लस कशी पोहचेल यासाठी व्यवस्था करणे गरजेचे आहे. केवळ पोकळ गप्पांनी किंवा आश्वासनाने कोरोनावर विजय नाही मिळविता येणार यासठी प्रत्यक्ष कार्य आणि वेग वाढणे गरजेचे असल्यचे कॉंग्रेसने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदींना भाजप विचारसरणीचे न्यायाधीश पाहिजे’, पी.चिदंबरम यांची टीका
- आज होणार अजित पवार यांची बैठक, पुण्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता
- आयपीएल स्पर्धेत बीसीसीआयने बायोबबलचे नियम केले कठोर, उल्लंघन झाल्यास कुटुंबावरही होणार कारवाई
- पहिली कसोटी निर्णायक टप्प्यात, विजयासाठी भारताला हव्या १५७ धावा
- पुणे शहरात आज नव्याने २०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


