मुंबई : शहरात कोरोना रुग्णसंख्येबरोबरच मृतांचा आकडादेखील मोठ्या प्रमाणात वाढतोय. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव कारागृहातील कैद्यांपर्यंत पोहोचला आहे. यखळा तुरुंगातही आता कोरोनाचा विस्फोट झाल्याचे समोर आले आहे. या तुरुंगात एकाच दिवसात ३८ महिला कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. यात शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीलाही कोरोनाची लागण झाली आहे.
वाढत्या कोरोना महामारीचा मोठा फटका मुंबईला बसला असून शहर आणि उपनगरांत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण मिळून लागल्याने प्रशासनाच्या सोयीसुविधांवर ताण पडू लागला आहे. अशातच भायखळा येथील महिला कारागृहातील ३८ महिला कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्याने खळबळ माजली आहे. राज्यातील अनेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत.
यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचेही पालन होताना दिसत नाही. त्यामुळे तुरुंगातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. अशा परिस्थितीत एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर तुरुंगातील कैदी बाधित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भायखळा जेलची ४६२ कैद्यांची क्षमता आहे. यात २६२ महिला व २०० पुरुष कैद्यांना ठेवण्याची व्यवस्था आहे. पण सध्या येथे ३०६ महिला व २०३ पुरुष कैद्यांना ठेवण्यात आले आहे. याआधीही कोल्हापूर कारागृहात १० दिवसांपूर्वी २८ कोरोना रुग्ण आढळले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोरोनाची दुसरी लाट मोदी निर्मित प्रकोप’, ममता बॅनर्जी यांचा घणाघात
- कोरोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीला भाजप जबाबदार-पी.चिदंबरम
- जिगरबाज! १०५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचे फळ
- सायंकाळी विक्री बंद असल्याने लाखो लिटर दूध पडून
- केंद्रीय आरोग्य पथक आले अन् बाधित होऊन गेले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

