Share

ताप आलेल्या लहान मुलांची आता सरसकट कोरोना चाचणी

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी लवकरच तिसऱ्या लाट धडकण्याचा अंदाज आहे. शिवाय त्या लाटेत लहान मुले मोठ्या प्रमाणात संक्रमित होण्याची भितीही वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे खबरबदारी म्हणून आता शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये ताप असलेल्या मुलांची कोरोना चाचणी होणार आहे. महापालिकेच्यावतीने या हॉस्पीटलांना तशा सूचना देण्यात येणार असून त्यासोबतच कोराेना चाचणीसाठी किटदेखील उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

तिसऱ्या लाटेसाठी महापालिकेने आत्तापासून तयारी सुरू केली आहे. याबाबत शासनस्तरावरुन नुकताच आढावा घेण्यात आला. त्यात तिसऱ्या लाटेसाठी प्रत्येक कोवीड केअर सेंटरमध्ये १५ टक्के खाटा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र, महापालिकेने गरवारे समुहाच्या मदतीने लहान मुलांसाठी स्वतंत्र कोवीड केअर सेंटरच सुरू केले आहे. लवकरच हे सेंटर कार्यान्वीत होईल, असे महापालिकेच्या डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

दरम्यान, तिसरी लाट कधीही येऊ शकते. शिवाय सध्या सर्दी, ताप, खोकल्याची साथ सुरू आहे. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दररोज असे अनेक रुग्ण, त्यात लहान मुले उपचारासाठी येत आहेत. खबरबदारी म्हणून तिथेच तापेने आजारी असलेल्या सर्व मुलांच्या कोरोना चाचण्या बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व खासगी हॉस्पीटलांना कोरोना चाचणी किट उपलब्ध करुन दिल्या जातील, त्यांनी मुलांचे नमुने घेऊन ते महापालिकेकडे द्यायचे. महापालिका ते तपासणीसाठी पाठवेल अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व हॉस्पीटलांना तशा सूचना आणि कोरोना चाचणी किट उलपब्ध करुन दिल्या जातील, असेही डॉ. पाडळकर म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!