🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी आता महापालिकने शहराच्या सहा एन्ट्री पॉइंटवर पुन्हा कोरोना चाचण्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचे नियोजन सध्या सुरु आहे. आगामी दोन दिवसात एन्ट्री पॉइंटवर आरोग्य विभागाची पथक तैनात करून कोरोना चाचण्या सुरु केल्या जाणार आहेत.
औरंगाबादेत गतवर्षी जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यावेळी रूग्णसंख्या अधिकच वाढू लागल्याने बाहेर गावाहून औरंगाबाद शहरात येणार्यांच्या तपासणीसाठी पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शहराच्या सहा एन्ट्री पॉइंटवर कोरोना चाचण्यांसाठी पथके तैनात केली होती.
चिकलठाणा येथील केंब्रीज शाळा, हर्सूल-सावंगी येथील टोल नाका, दौलताबाद टी पॉइंट, नक्षत्रवाडी, झाल्टा फाटा या पाच ठिकाणी कोरोना चाचणीसाठी पथकांची नियुक्ती केली होती. बाहेर गावाहून येणार्यांची या पॉइंटवर चाचणी केली जात होती. चाचणी निगेटिव्ह आली तरच शहरात प्रवेश दिला जायचा.
या एन्ट्री पॉइंटवरील चाचण्यांमुळे सुमारे चाळीस हजारावर नागरिक करोनाबाधित होण्यापासून वाचले, असा दावा केला गेला. आता पुन्हा शहरात बाधितांची संख्या वाढते आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे शहराच्या एन्ट्री पॉइंटवर कोरोना चाचणी करण्याचे नियोजन केले जात आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी शुक्रवारी दिली.
येथील चाचण्यांतून पॉझिटिव्ह निघालेल्यांना तेथूनच कोविड केअर सेंटर किंवा खासगी दवाखान्यात पाठवण्यात येईल. त्यामुळे काही प्रमाणात संसर्गाला ब्रेक लागण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पेट दुसरा पेपर सुरळीत, ६ हजार २७३ विद्यार्थ्यांनी दिला ऑनलाईन‘ पेपर
- शरद पवारांच्या नजीकच्या सहकाऱ्याचं निधन; फोटोसह शेअर केली भावनिक पोस्ट !
- उघड्यावर फेकत असलेला जैविक कचरा सरपंचानी पकडला
- त्या’ वेळी प्रशासनाने कारवाई करायला पाहिजे होती – आ. अतुल सावे
- खळबळजनक! लसीकरण केल्यानंतरही २१ जण कोरोना बाधित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

