🕒 1 min read
जालना: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून वारंवार सूचना, विनंती, आवाहन करूनही काही जण नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. अशाच विनाकारण व किरकोळ कामानिमित्त फिरणाऱ्यांची अँटिजन टेस्ट करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी घेतला. यावर अंमल करत अंबड चौफुलीवर एका ज्यूस सेंटरमध्येच सोमवारी दुपारी ३ वाजता अँटीजन टेस्टिंग सेंटर सुरू केले. यावेळी ७० लोकांची चाचणी करण्यात आली, त्यापैकी चौघांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली.
तिघे कोरोनाबाधित हॉस्पिटलचे कारण सांगून घराबाहेर निघाले होते. या वेळी कोरोनाबाधितांच्या मुक्त संचाराचा अंदाज येताच टेस्टिंगची मोहीम गतिमान करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बिनवडे यांनी दिले. या पद्धतीने टेस्टिंग वाढवून कोरोनाची साखळी तोडता येईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला. या वेळी पोलिस उपधीक्षक सुधीर खिरडकर, कदीम जालना पोलिस ठाण्याचे पीआय प्रशांत महाजन यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी मास्क बांधणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक असून यासाठी शहरापासून गाव-खेड्यांपर्यंत जनजागृती करण्यात येत आहे. याला काहींचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, तर काही जण दुर्लक्ष करत आहेत. शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत ५ एप्रिल रोजी निर्बंध कडक केले, तर १४ एप्रिलपासून राज्य शासनाने संचारबंदी लागू केली.
महत्वाच्या बातम्या
- चेन्नई सुपर किंग्सची गुणतालीकेत भरारी; मुंबई आणि दिल्लीला टाकले मागे
- ‘चाचा विधायक है हमारे’, फडणवीसांच्या पुतण्याने नियमावली धुडकावत घेतली कोरोना लस !
- तिच तारीख, तोच कर्णधार, संघही तोच.. अगदी निकालही तोच.. बदलले फक्त वर्ष ; माहीचा अनोखा पराक्रम
- ‘मोदींच्या नेतृत्वात देशात कोरोनमुक्ती सोडाच, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे’
- सलग दुसऱ्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजाचा बोलबाला; राजस्थानला ४५ धावांनी केले पराभूत


