Share

काँग्रेसच्या रॅलीत कोरोना नियमांचा बट्ट्याबोळ ! शिवजयंतीवर निर्बंध पण राजकीय पक्षांना लगाम घालणार कोण ?

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा कारभार स्वीकारताच नाना पटोले हे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. सुमारे अडीच महिन्यांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. काँग्रेससह विविध पक्षांनी व संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

दुसरीकडं, गेल्या काही दिवसांपासून इंधनांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केल्याचं समोर आलं आहे. यामुळे सामन्यांच्या खिशावर आर्थिक बोजा वाढत आहे. केंद्र सरकारला शेतकरी आंदोलन व महागाईच्या मुद्द्यावरून घेरण्यासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून आज नागपूरमध्ये पद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ही पद यात्रा पार पडली असून शेकडो कार्यकर्ते व मोठा जनसमुदाय या पदयात्रेत सहभागी झाले होते. तर, ट्रॅक्टर रॅली देखील काढण्यात आली होती. यावेळी कोरोना नियमांना हरताळ फासल्याचं दिसून आलं. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशासह प्रदेशात देखील मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. मात्र, यंदा शिवजयंतीच्या कार्यक्रमांवर कोरोनाच सावट असल्याने निर्बंध घालण्यात आले आहेत.

तर दुसरीकडं, विविध पक्षांचे मोर्चे, आंदोलने सर्रास सुरु असल्याचं दिसून येत आहे. शिवजयंतीच्या आदल्याच दिवशी काँग्रेसची रॅली व मोर्चे चालतात मग शिवजयंतीवरच नियम का ? असा सवाल उपस्थित होत आहे. नियम असतील तर ते सरसकट हवेत. मात्र शिवजयंतीवर निर्बंध पण राजकीय पक्षांना लगाम घालणार कोण ? सत्तेतील पक्षांना राजाश्रय का ? असे संतापजनक सवाल शिवभक्तांकडून उपस्थित केले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!