🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द करण्यात आली आहे. यामुळे अनेक खेळाडू मायदेशी परतण्याच्या मार्गावर आहेत.
स्पर्धा रद्द झाल्याने बाकावरील अनेक खेळाडुंचे स्वप्न भंगले. यात सर्वात दुर्दैवी ठरला तो कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू संदिप वॉरियर. आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात संदिपला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र कोरोनाने मात्र त्याला गाठले. केकेआरने स्पर्धेत ७ सामने खेळले होते. यात केकेआरचा संघ केवळ २ सामन्यात विजय मिळवु शकला तर ५ सामन्यात केकेआरला पराभव स्विकारावा लागला.
दुर्दैवाने केकेआरचा आठवा सामना खेळण्यापुर्वी संदिप वॉरियर आणि वरुण चक्रवर्ती यांना कोरोनाची लागण झाली. यामुळे केकेआरचा आरसीबीविरुद्ध नियोजीत सामना हा पुढे ढकलण्यात आला. तर दुसऱ्याच दिवशी स्पर्धेतील आणखी दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. यानंतर बीसीसीआयने तत्काळ बैठक बोलावली आणि अनिश्चित काळासाठी आयपीएल स्पर्धा रद्द केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘सीएसके’चा मराठमोळा ऋुतुराज गायकवाड झाला अभिनेत्री ‘सायली’च्या फोटोवर फिदा
- बीड जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर पोलिसांना धक्काबुक्की; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
- धक्कादायक! ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूचे अपहरण आणि एका तासात सुटका
- गेली ३५-४० वर्षे समाजाने केलेल्या संघर्षावर आज पाणी फिरले गेले : शिवसंग्राम
- राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या मुलाचे धुमधडाक्यात लग्न, गुन्हा दाखल

