🕒 1 min read
पुणे : कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये पुणे शहराला मोठा फटका बसला होता. पुणे जिल्ह्यासह शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ही चिंताजनक होती. आता कोरोनाची दुसरी लाट देखील शहरातून ओसरली असून पुणेकरांना नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान, कोरोना काळात केलेल्या रोग निवारणासाठी ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन’ने पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना सन्मानित केलं आहे.
हा सन्मान स्वीकारल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी हे यश कर्मचाऱ्यांसह सामान्य पुणेकरांचं देखील असल्याचं म्हटलं आहे. ‘कोरोना काळातील कामाची दखल ‘World Book Of Records, London’ कडून ! आपल्या पाठीमागे आपल्या कामाची दखल घेतली गेली आहे, ही भावना प्रचंड सुखावणारी आहे. कोरोना काळात पुणेकरांच्या सेवेत सर्व पातळ्यांवर काम करत असताना याची नोंद ‘World Book Of Records, London’ ने घेतली आहे,’ अशी माहिती मोहोळ यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
कोरोना काळात केलेल्या कामाची नोंद म्हणून 'Certificate Of Commitment' हे कामाची नोंद घेणारे प्रमाणपत्र आज संस्थेकडून आपण स्वीकारले.
'World Book of Records' मधील ही नोंद माझ्या वैयक्तीक नव्हे तर पुणे शहराने केलेल्या सामूहिक प्रयत्नांची आहे, असे मी मानतो. pic.twitter.com/kgJNXBsD0P
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 11, 2021
यासोबतच, ‘कोरोना काळात केलेल्या कामाची नोंद म्हणून ‘Certificate Of Commitment’ हे कामाची नोंद घेणारे प्रमाणपत्र आज संस्थेकडून आपण स्वीकारले. ‘World Book of Records’ मधील ही नोंद माझ्या वैयक्तीक नव्हे तर पुणे शहराने केलेल्या सामूहिक प्रयत्नांची आहे, असे मी मानतो. कोरोना काळात विविध घटकांनी मोलाची साथ दिली, न डगमगता भक्कमपणे उभे राहिले, त्यासर्वांच्या ऋणात राहूनच या जागतिक नोंदीनिमित सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !,’ असं देखील मोहोळ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘ही’ प्रक्रिया केली तरच मिळेल मराठा आरक्षण ; आशिष शेलारांनी सांगितला सरकारला मार्ग
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
- ‘ते जर अमजद खान असतील तर…’ ; आशिष शेलारांचा पटोलेंना टोला
- काँग्रेसचा भाजपला धक्का; पटोलेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘शिवसेना खा.प्रतापराव जाधव, आ.गायकवाड यांची ईडीमार्फत चौकशी करा’, जोगेंद्र कवाडेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

