Share

‘वाझेबाबत ‘तो’ निर्णय शिवसेनेचाच होता, तर राऊतांनी सुद्धा त्यांच्या कृत्याबाबत इशारा दिला होता’

Published On: 

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हे एनआयएच्या अटकेत आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढत आहे.

महाविकास आघाडी सरकारने वाझेंना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर, वाझेंविरोधात सबळ पुरावे आढळल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर, ‘सचिन वाझेंना परत रुजू करताना, ते महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ करू शकतात असा इशारा काही नेत्यांना दिला होता’ असं भाष्य शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान, वाझेंना रुजू करण्यामागे शिवसेनेच्या नेतृत्वाचा हस्तक्षेप असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता याला आता राऊतांच्या विधानामुळे दुजोरा मिळाल्याची टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला पोलीस खात्यात बहाल करण्याचा निर्णय शिवसेना नेतृत्वाचा होता असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. आता या आरोपाची संजय राऊत यांनी पुष्टीच केली आहे. वाझेला परत आणले तर हा समस्या निर्माण करेल असा इशारा मी MVAनेतृत्वाला दिला होता असे राऊत सोमवारी म्हणाले होते,’ अशी टिप्पणी भातखळकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!