🕒 1 min read
पंढरपूर : पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
या पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी भाजप उमेदवार समाधान अवताडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विजयसिंह मोहिते पाटील यांचेसह आमदार विनायक मेटे, गोपीचंद पडळकर, प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, रणजितसिंह मोहिते पाटील, सचिन कल्याणशेट्टी, खासदार रणजित निंबाळकर व खासदार जय सिद्धेश्वर स्वामी उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खबल्जनक दावा केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बवर पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. परमबीर सिंग प्रकरणात आता ईडी आणि सीबीआयही येणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच सत्तांतराला कोणताच मुहूर्त नसतो, असं विधानही त्यांनी केलं आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पंढरपूर येथे चंद्रकांत पाटील यांनी हे धक्कादायक आणि मोठं विधान केलं. परमबीर सिंग प्रकरणात आता ईडी आणि सीबीआय येणार. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, असं पाटील म्हणाले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोला लगावला. आम्ही रात्री अथवा दिवसा सत्तांतराची स्वप्ने पाहात नाही. सक्षम विरोधी पक्ष म्हणून रोज रस्त्यावर उतरतो, असं सांगतानाच सत्तांतराला कोणताच मुहूर्त नसतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- बांगलादेश दौर्यादरम्यानच्या मंदिर भेटीवरून तृणमूलकडून मोदींवर आचारसंहिता भंग केल्याची तक्रार
- चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो – उद्धव ठाकरे
- ‘या’ तारखेला विराट आरसीबीच्या कॅम्पमध्ये दाखल होणार
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
