Share

राणा दाम्पत्याच्या फोटोला चपलांचा हार; होळीचा अवमान केल्याने शिवसेनेचा संताप

Published On: 

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विनोद शिवकुमार आणि मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी सातत्याने दीपाली चव्हाण यांना त्रास दिल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी होळीचा सण कोरोनाच्या सावंतामुळे साधेपणाने साजरा करण्यात आला. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करण्यासाठी मेळघाट या ठिकाणी गेले होते. गेल्या ११ वर्षांपासून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे मेळघाटात आदिवासी समुदायासोबत होळी साजरी करतात.

दीपाली चव्हाण प्रकरणात आरोपी असलेल्या विनोद शिवकुमार आणि मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या निषेधार्थ होळी करण्यात आली. मात्र, पवित्र होळीमध्ये चपलांचा वापर केला गेल्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याची टीका शिवसेनेनं केली आहे.

यामुळे शिवसेनेनं संताप व्यक्त करत राणा दाम्पत्याविरोधात आंदोलन देखील केलं आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार नवनीत राणा यसंचयासह आमदार नवनीत राणा यांच्या फोटोला हार घालून शिवसेनेनं आक्रमक आंदोलन केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!