Share

उस्मानाबादेत कोरोनाने ११ जणांचा मृत्यू; ६२९ नव्या रुग्णांची वाढ

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद: राज्यात तसेच  जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. त्यातच वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. जिल्ह्यात  नव्या रुग्णांची भर दिवसेंदिवस पडत असली तरी त्यातून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. शनिवारी कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या ८४९ होती तर कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी कोरोनाने ११ जणांचा मृत्यू झाला असून, ६२९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यातील दिलासादायक बातमी अशी की शनिवारी ८४१ जण कोरोनातून मुक्त झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आता जिल्ह्यात सध्या ६ हजार ९१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शनिवारी दिवसभरात ११ जणांचा बळी गेला आहे. नव्या रूग्णांची संख्याही कमी होत नाही. त्यामुळे जिल्ह्यात सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच आता ६२९ नव्या रूग्णांची भर पडली असून, त्यात उस्मानाबाद शहरासह तालुक्यात सर्वाधिक २३५ रूग्णांचा समावेश आहे. सिंदगावच्या ३५ वर्षीय तरूणासह उस्मानाबादेतील ३८ वर्षाच्या तरूणाचा कोरोनाने बळी घेतला आहे. जिल्ह्यातील कोरेाना रूग्णांची संख्या ४३ हजार ९८६ झाली आहे तर ३६०४९ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनाने आतापर्यंत १०२४ जण दगावले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!