औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील पाल परिसरातील गावातील नागरिकांसाठी कोविड-१९ प्रतिबंधक लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष संतोष जाधव यांनी तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे केली.
या निवेदनात म्हटले आहे की, जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र पाल अंतर्गत येणाNया पालसह माळोदेवाडी, जाधववाडी, महाराणा प्रताप नगर, गायकवाड वस्ती येथील सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून घ्यावी अशी मागणी केली. या निवेदनावर उपसरपंच ज्ञानेश्वर तेजराव जाधव, ग्रामपंचायत सदस्य शार्दुल काळे, सभापती सविता पुâके, सर्जेराव मेटे, संतोष जाधव भाऊसाहेब बनसोड यांच्या सह्या आहे.
सध्या केंद्राकडून लसीचा पुरवठा नियमित येत नाही आहे. त्यातच जिल्ह्याला मिळालेल्या लसीच्या साठ्यामधून आता किती पुरवठा होतो. याकडे सगळ्या ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. मात्र, ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या बघता हि मागणी करण्यात आल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपा का बाबा बंगाली!’ राष्ट्रवादी काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका !
- महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने कडक निर्बंध लावण्याची वेळ मात्र,अर्थचक्राला झळ बसू देणार नाही – मुख्यमंत्री
- ज्यादा भाडे दर आकारणार्या रुग्णवाहिकांवर परभणी आरटीओ कारवाई करणार
- राज्यात सतराशे साठ लोक वेगवेगळं बोलताहेत, ज्याने नुसता गोंधळ झालाय; ‘ई-पास’वरून चित्रा वाघ संतापल्या
- बीड येथे वाळू माफियांवर कारवाई; ५० ब्रास वाळूसह दोन बोटी जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

