सातारा : ७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमारतीवरून उडी मारत जीवन संपवले होते. या तरुणीचे संबंध हे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी जोडल्याचे आरोप होत असून कथित ऑडिओ रेकॉर्डिंग्ज देखील आता समोर आले आहेत. यामुळे संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारीचं भान राखत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे.
मात्र, संजय राठोड यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून अद्यापही ते पदावर कायम आहेत. राठोड यांनी २३ फेब्रुवारीला पोहरादेवी येथे जाऊन संत सेवालाल महाराज व देवीचं दर्शन घेतलं होतं. यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संबंधी केलेल्या आवाहनाला केराची टोपली दाखवत हजारो समर्थकांनी गर्दी केली होती. यात शिवसेनेचे नेते देखील सहभागी झाले होते.
यामुळे, संजय राठोड यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली असून महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष देखील नाराज झाले आहेत. दुसरीकडं, भाजप देखील राठोड यांच्यावर कारवाई केली जावी यासाठी दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. यावर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील भाष्य केलं आहे. ‘या प्रकरणात योग्य शासन झालंच पाहिजे. संजय राठोड यांच्यावर कारवाई झाली नाही तर जनतेचा प्रशासन आणि पोलिसांवरच विश्वास उडेल,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दोन महिन्यात ‘दाजीं’च्या दोन खंद्या कार्यकर्त्यांना मारहाण, शहरात चर्चेला उधाण
- ‘राजसाहेब शिवजयंतीला शुभेच्छा द्यायला विसरले, परंतु सावरकरांना मात्र आवर्जून अभिवादन केले’
- मुंबईत विकासकांना करात सूट, सर्वसामान्यांची होणार लूट?
- प्रतिष्ठा पणाला…पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं; आठ टप्प्यांत होणार निवडणूक
- कोरोनाला हददपार करण्यासाठी शनिवार आणि रविवार ‘या’ शहरात पाळला जाणार बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
