Share

कोरोना वाढतोय : मुंबई महापालिकेचा ॲक्शन प्लॅन, घेतले ‘हे’ मोठे निर्णय

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुसऱ्या लाटेचे संकट रोखण्यासाठी महापालिकेने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार दैनंदिन चाचण्‍यांची संख्‍या २५ हजारांवरुन टप्प्याटप्प्याने ५० हजारांवर नेण्यात येणार आहे. तर दररोज एक लाख याप्रमाणे ४५ दिवसांमध्‍ये ४५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्‍याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. यासाठी लस देणाऱ्या खासगी रुग्‍णालयांची संख्‍या ५९ वरुन ८० पर्यंत वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबईत दररोज अडीच हजारांहून अधिक बाधित रुग्णांची नोंद होत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी सर्व मुंबईकरांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र खासगी रुग्‍णालयांमध्‍ये लसीकरणाचे प्रमाण पालिका रुग्णालयांच्या तुलनेने अत्‍यल्‍प आहे.

त्यामुळे खासगी व पालिका रुग्णालयांची आयुक्‍त इकबालसिंह चहल यांनी शुक्रवारी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे विशेष बैठक घेतली. यावेळी रुग्णालयांतील खाटांचे व्यवस्थापन तसेच लसीकरण यावर आयुक्‍तांनी सूचना केल्‍या आहेत.

लसीकरणासाठी खासगी रुग्‍णालयांची संख्‍या सध्‍याच्‍या ५९ वरुन ८० पर्यंत नेण्‍यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. ही मंजुरी मिळताच सर्व सरकारी व खासगी रुग्‍णालये मिळून दररोज किमान एक लाख नागरिकांना लस देण्‍याचे नियोजन करण्‍यात येईल.

ज्या लसीचा पहिला डोस घेतला असेल, त्याचाच दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. त्याप्रमाणे लस उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!