परभणी : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीमुळे बाजारपेठेसह रस्त्यांवर शुक्रवारी सायंकाळी साडेसातनंतर शुकशुकाट पहायला मिळाला. दरवेली गजबजलेली बाजारपेठेत, भाजीबाजार, कपडा मार्केटसह परिसरात खुप सन्नाटा होता.
जिल्ह्यात दररोज कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शुक्रवार (दि. १९) ते गुरुवार (दि. 25) मार्चपर्यंत सायंकाळी सात ते सकाळी सहा यावेळेत संचारबंदीचे आदेश लागू केलेले आहेत. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास शहरातील तिन्ही पोलिस ठाण्यासह जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्याच्या अधिकारी – कर्मचार्यांनी ध्वनिक्षेपकावरून बाजारपेठेतील तसेच परिसरातील व्यापार्यांना दुकाने बंद आवाहन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला खुप चांगला प्रतिसाद देत दुकाने बंद देखील केली.
शहरातील नवामोंढा पोलिस ठाणे, नानलपेठ पोलिस ठाणे, कोतवाली पोलिस ठाणे, ग्रामीण पोलिस ठाणे येथून ध्वनिक्षेपकावरून आवाहन करीत व्यापार्यांना आपापली प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन केले होते. तर रस्त्यावर फिरणार्या नागरिकांनीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. यामुळे सायंकाळी साडेसातच्या सुमारासच परभणी शहरात शुकशुकाट पसरला. व्यापारी आपापली प्रतिष्ठाने बंद करून घराकडे रवाना झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसह प्रशासनाने केलेले आवाहन या वेळी मात्र नागरिकांनी इमानदारीने पाळल्याचे दिसून आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; पृथ्वीला संधी नाहीच
- राज्य सरकारचे ओबीसींच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष, चंद्रशेखर बावनकुळे उतरणार रस्त्यावर
- अक्षयकुमारने ‘ रामसेतू’ चित्रपटचा आयोध्येतून केला शुभारंभ
- विमाक्षेत्रात एफडीआयचे प्रमाण ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के इतके वाढवले
- गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

