🕒 1 min read
मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाचा धोका पुन्हा एकाद वेगाने वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढलेली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी, कोरोनाचे वाढते रुग्ण थांबवण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. कोरोनाचे हॉट्स्पॉट ठरलेल्या मुंबईत बाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढू लागला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उद्यापासून नाईट कर्फ्यू लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, अशा सूचनाही महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिल्या आहेत.
मुंबईकरांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी अनेक सूचना केल्या आहेत. मुंबईकरांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहे. त्या सर्वांना वर्क फॉर्म होमच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुंबईत झोपडपट्ट्यांपेक्षा मोठ्या इमारतींमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळेच ज्या ठिकाणी ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळतील, त्या इमारती सील केल्या जात असल्याचे त्या म्हणाल्या.
याशिवाय मंत्रालयाच्या वेळा ज्याप्रमाणे बदलल्या आहेत, त्याचप्रमाणे खाजगी कार्यालयांनीही कार्यालयीन वेळा बदलाव्यात, असं आवाहन महापौरांनी केले आहे, जेणेकरून एकाच वेळी लोकल/बसमध्ये होणारी गर्दी नियंत्रणात येईल.
झोपडपट्टी भागातून लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढत नाही. त्यामुळे केंदाकडून डोअर टू डोअर लसीकरणाची परवानगी मागितली आहे. यासाठी केंद्राकडून लसीचा साठाही मागवण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फुकटात मंत्रिपद मिळालंय, म्हणून आव्हाडांची वळवळ सुरु आहे – राणे
- पांड्याला गोलंदाजी न देण्याचं कारण ऐकून सेहवाग कोहलीवर भडकला
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- घरबसल्या दहा मिनिटात मिळवा पार्लरसारखा ग्लो ; करा ‘हा’ उपाय
- शेतकऱ्यांची वीज तोडली;भाजपा आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
