Share

शाळा, कम्युनिटी हॉल आणि पार्किंगचा वापर लसीकरण केंद्र म्हणून करा : भाजपा

Published On: 

मुंबई – महाराष्ट्रातील लसीकरणाची गती मंदावल्यास राज्यात करोनाची तिसरी लाट येऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांनी बुधावारी महाराष्ट्रातील करोना परिस्थितीसंदर्भात इशारा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने पुरेश्या प्रमाणामध्ये लसी उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वर्षांमधील व्यक्तींचं लसीकरण एक मे पासून सुरु न करता पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर केल्यानंतर ही माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान,एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसरीकडे  नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी  मुंबईतील बीएमसी शाळा, कम्युनिटी हॉल आणि बीएमसी पार्किंगचा वापर लसीकरण केंद्र म्हणून करण्याबद्दल भाजपा उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष संजय पाण्डेय यांनी महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहले आहे.या पत्रात पाण्डेय म्हणाले की, 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांसाठी लसीकरण सुरू होणार असल्याने लसीकरण मोहीम कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी योजना आखणे आणि त्यांचे धोरण आखणे महत्वाचे आहे. जेणेकरून लोकांना जास्त गैरसोय सहन करावी लागू नये,

विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना बराच काळ रांगेत उभे राहून त्यांना संसर्ग होण्याचा अधिक धोका असतो.लसीकरण मोहीम सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी बीएमसी शाळा, कम्युनिटी हॉल आणि बीएमसी पार्किंगचा लसीकरण केंद्र म्हणून वापर करण्याची विनंती पांडेय यांनी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना केली.

ते पुढे म्हणतात की किमान लॉजिस्टिकच्या मदतीने ते त्वरीत स्थापित केले जाऊ शकतात. यामुळे लोक सुरक्षित राहतील आणि रुग्णालयांपासून दूर राहतील. याव्यतिरिक्त, हे लोकांना लस घेण्यासाठी बाहेर पडण्यास हे प्रोत्साहित करेल असे देखील पाण्डेय म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!