मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत ठाकरेंनी त्यांच्या अट मान्य न केल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असतानाच महत्वाची माहिती समोर येत आहे.
राज्यपाल यांच्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. व्हिडीओ कॉलद्वारे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहतील असेही नाना पटोले म्हणाले. तसेच एकीकडे विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण नाहीये असं म्हंटलय तर दुसरीकडे नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगितले. त्यामुळे कोरोनावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद होत असताना पाहायला मिळत आहेत.
एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसोबत केला गट स्थापन –
एकूण ४० आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. महेंद्र थोरवे ,भरत गोगावले, महेंद्र दळवी, अनिल बाबर, महेश शिंदे, शहाजी पाटील, शंभूराज देसाई, बालाजी कल्याणकर, ज्ञानराजे चौघुले, रमेश बोरणारे , तानाजी सावंत, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, नितीन देशमुख ,प्रकाश सुर्वे, किशोर पाटील, सुहास कांदे, संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, संजय रायुलकर, संजय गायकवाड, एकनाथ शिंदे ,विश्वनाथ भोईर, राजकुमार पटेल, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, प्रताप सरनाईक, प्रकाश अबिटकर, चिमणराव पाटील, नरेंद्र बोंडेकर, लता सोनावणे, यामिनी जाधव, बालाजी किनीकर अशी या आमदारांची नावे आहेत.
महत्वाच्या बातम्या –


