Share

Sanjay Raut VS Chitra Wagh : “…हा मार्ग सरकारला तुम्हीच बनवून दिला”, ‘त्या’ ट्वीटनंतर चित्रा वाघ यांचा राऊतांवर निशाणा

Published On: 

मुंबई: महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत.  अशातच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खळबळजनक ट्विट केले आहे. त्यालाच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“हि दिशा आणि हा मार्ग सरकारला तुम्हीचं बनवून दिलाय सर्वज्ञानी जी”, असा टोला चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्वीट करत लगावला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले की, “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या  दिशेने.” या ट्वीटनंतर राजकीय क्षेत्रात अनेक अर्थ लावले जात आहेत. कोणत्याही क्षणी ठाकरे सरकार पडू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज एकनाथ शिंदे मुंबईला येणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपसोबत सत्तास्थापनेचा ते दावा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र राज्यपाल कोश्यारी यांना आजच कोरोनाची लागण झाल्याने ते रिलायन्स रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजपची पुढची भूमिका काय असेल, याबाबत आता चर्चा रंगत आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!