औरंगाबाद : महाराष्ट्र सरकारने कोराना नियमांबाबत खुप ठिलेपणा केला. तसेच गर्दी जमु दिली, त्याता परिणाम आज कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येते. तर त्यामुळे हा लॉकडाऊन करण्याची वेळ सरकारवर आली असल्याचे मत माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या वर्षी लॉकडाऊन लावला होता. तेव्हा हेच सरकार मजुर कसे जगणार, उद्योग व्यापाराचे काय होणार. गरिब – पोच कसे भरणार असे म्हणत विरोध केला होता. परंतू आता उद्धव ठाकरे सरकारने अन लॉकची घाई करुन सर्व सरळीत झाल्याचे भासवले. आणि याचा परिणाम संपुर्ण महाराष्ट्रामध्ये कोराना रुग्णांची संख्या खुप मोठ्या गतीने वाढलेली दिसुन आली. तर आता महाराष्ट्रातील अनेक भागात हळुहळु लॉकडाऊन घोषीत करण्यात येत आहे. आता गरिबांना काम, जेवण मिळत आहे का? आणि उद्योग व्यापार बुडत नाही का? असा सवाल या वेळी हरिभाऊ बागडे यांनी सरकारला विचारला आहे.
आता शहरासह ग्रामीण भागात देखील कोराना रुग्णांची आटोक्यात राहिलेली नाही. तसेच ती खुप झपाट्याने वाढत असल्याने तत्काळ प्रतिबंधक उपाययोजना म्हणजेच बंदचे नियम पाळले असते तर ही अवस्था आज बघायला मिळाली नसली. आणि सरकारमधील अनेक मंत्र्यांनी विविध विकास कामांचे उद्घाटन करताना खुप मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमा केली होती. तेव्हा कोरोना संपला होता का?
आणि विविध मतदारसंधामध्ये विकास कामे उद्घाटन, संमेलन, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तेव्हा खुप मोठ्या प्रमाणात विविध पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक देखील त्यांना विविध कामे करण्याच्या मागणीसाठी आले होते. तर आता गर्दी जमा केल्यानंतर कोराना वाढणार होता हे मात्र नक्कीच होते आणि तसेच झाले. याचा परिणाम आज रुग्ण वाढल्याचे दिसत असल्याचे मत देखील आमदार हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
- वाईट सुरुवातीनंतरही भारतीय संघ कसा उभारतोय मोठी धावसंख्या
- पांड्याला गोलंदाजी न देण्याचं कारण ऐकून सेहवाग कोहलीवर भडकला
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- फुकटात मंत्रिपद मिळालंय, म्हणून आव्हाडांची वळवळ सुरु आहे – राणे
- शेतकऱ्यांची वीज तोडली;भाजपा आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
