Share

#CoronavirusEffect : तुळजापूर, सिद्धिविनायक, गणपतीपुळे मंदिरसह अनेक मंदिरं दर्शनासाठी बंद

Published On: 

मुंबई : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना आजाराचा भारतात धोका वाढलेला आहे.त्याचाच धसका आता आपल्या राज्यातील अनेक देवस्थानांनी घेतला आहे.शासनाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत तुळजाभवानी देवीचं दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तर नाशिकच्या वणी गडावरचा चैत्रोत्सवही रद्द करण्यात आला आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील अन्नछत्रही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अष्टविनायक क्षेत्र असलेले पाली येथील बल्लाळेश्वर मंदिरही ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे.

राज्यात सध्या सर्वच देवस्थानांनी मंदिरं बंद ठेवण्याचा किंवा खबरदारीचे उपाय केले आहेत. पण, रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिर मात्र अद्याप देखील सुरू होतं. पण, जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत मंदिर प्रशासनाला सूचना देत आजपासून गणपतीपुळे मंदिर हे पुढील सूचना अथवा निर्णय होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरातील दर्शन ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या काळात मंदिरातले सगळे विधी बंद असणार आहेत. गर्दी करु नका असे आदेश देवूनही भाविकांनी गर्दी केल्याने मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मंदिर आज पहाटे 5 वाजता विधिवत पूजा करून भाविकांसाठी दर्शनासाठी बंद करण्यात आले. आजपासून देवीचे मंदिर सरकारचे पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहे. तुळजाभवानी देवीची चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!