Share

औरंगाबादेत ऑनलाइनपेक्षा ऑफलाईन लसीकरण केंद्रावरच जास्त गर्दी!

Published On: 

औरंगाबाद : राज्य सरकारने ३० ते ४४ वयोगटातील तरुणांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार औरंगाबाद महापालिकेने नियोजन केले आहे. आज पासून ३० ते ४४ या वयोगटातील तरुणांना लस घेण्यासाठी कोविन अॅपवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करून लस घेण्यासाठी ३७ तर थेट लस घेण्यासाठी ३० केंद्रांवर सोय करण्यात आली आहे.

रविवारी पालिकेला आणखी १० हजार कोवीशिल्ड तसेच काही हजार कोवॅक्सिन लसींचा साठा प्राप्त झाला आहे. सकाळपासूनच ऑफलाईन लसीकरण केंद्रांवर तरुणांची झुंबड उडाली असून ३० ते ४४ वयोगटाचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ऑनलाईन नोंदणी किचकट असल्याने ऑफलाईन केंद्रांवर जास्त गर्दी पाहायला मिळत आहे.

शहरातील ६७ केंद्रांवर ४५ प्लस नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस मिळणार आहे. २१ जूनपासून केंद्र सरकारने २१ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा केला असला तरीही लसींच्या उपलब्धतेनुसार राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने ३० ते ४४ वयोगटातील तरुणांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आलेल्या लसीकरणाला शहरात तरुणांनी भरभरून प्रतिसाद देत २ हजार ८० तरुणांनी लसीचा पहिला डोस घेतला.

प्रायोगिक तत्त्वासाठी शनिवारी केवळ दहा केंद्र ठरवण्यात आले होते. त्यामुळे तरुणांनी लस घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. मात्र आजपासून ६७ केंद्र वाढवण्यात आले आहेत. यात कोविन अॅपवर नोंदणी केल्यास ३७ केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ऑफलाईन पद्धतीने लस घेणाऱ्यांसाठी ३० केंद्र ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी होत नसल्यास ऑफलाईनचा पर्याय देखील देण्यात आला आहे. यामुळे गर्दी विभागली जाईल असेही आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!