मुंबई : क्रिकेट सट्टेबाजीवर आधारीत ‘इनसाईड एज’ नावाची एक वेब सिरीज काही दिवसापुर्वी प्रदर्शीत करण्यात आली होती. या सिरीजच्या पहिल्या भागाच्या यशानंतर निर्मात्यांनी या वेब सिरीजचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. आता दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर या वेब सिरीजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटील येत आहे.
भारतामध्ये क्रिकेट हा नुसता खेळ नसुन धर्म मानला जातो. याच खेळाची सट्टेबाजीची काळी बाजु दर्शवीणारी वेब सिरीज म्हणजे ‘इनासाईड एज’. या वेब सिरीजमध्ये क्रिकेटमध्ये सट्टेबाजी आणि मॅच फिक्सींग या सारखे प्रकार काल्पनीक कथाच्या आधारे दाखवीण्यात आले होते. तसेच या मालिकेत क्रिकेट सामन्याचीही मेजवानी प्रेक्षकांना मिळाली होती. तसेच या वेब सीरीजमध्ये अॅक्शन आणि थरारही बघायला मिळाला होता.
या सिरीजच्या पहिल्या दोन्ही भागात विवेक ओबेरॉय आणि रिचा चढ्ढा यांच्या मुख्या भूमिका होत्या. क्रिकेटच्या सट्टेबाजीत या दोघात सुरु असलेली चढाओढ ही या कथेचा मुख्य गाभा असते. विवेक ओबेरॉय आणि रिचा चढ्ढा व्यतिरिक्त अंगद बेदी, तनुज विरवानी, सिद्धांत चतुर्वेदी, अमिर बशिर या कलाकारांच्या भूमिका आहेत. या भागाचे दिग्दर्शन कनिष्क वर्मा हे करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस मंत्र्याचे आवाहन, ‘केंद्राने राज्यासाठी दिलेल्या ‘या’ निधीचा लाभ घ्या’
- ‘सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी नवे नियम’, मोदी सरकारची संयुक्त राष्ट्रात भूमिका
- ‘जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देऊनच विधानसभा निवडणुका घ्या’
- ‘मराठा व ओबीसी आरक्षण ही तुमची जबाबदारी, केंद्राकडे बोट दाखवू नका’, पंकजा मुंडेंचा ठाकरेंना इशारा
- दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतलंय, हे लक्षात ठेवावे-हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

