Share

रामदास आठवले यांनी कविता करत दिल्या योग दिनाच्या शुभेच्छा

Published On: 

मुंबई : जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून रोजी साजरा केला जातो. योग आयुष्यात सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानंतर 21 जून 2015 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला होता. लोकांना योगाबद्दल जागरूक करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता, कारण योग केल्याने एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकते. सध्याच्या कोरोना काळात तर योगाचे महत्त्व आणखीन वाढले आहे.

आजच्या योगादिनानिमित्त सेलीब्रीटीपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत योग दिन साजरा केला जात आहे. तसेच अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून योगदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच नियमित योगा करण्याचा सल्ला देखील देत आहेत. अशातच आता खासदार रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत योग दिनानिमित्त एक कविता ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

रामदास आठवले यांनी ट्विटरवरुन कविता पोस्ट करत लिहिले की, ‘नेहमी करा योग, तुमच्याजवळ येणार नाही रोग ! नेहमी करा योग,निघून जाईल तुमचा रोग! रामदास आठवले हे त्यांच्या कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांमुळे ते कायमच चर्चेचा विषय ठरतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!