Share

कोरोना इफेक्ट; डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात ६२ टक्के जागा रिक्त

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाचा मोठा परिणामशिक्षण क्षेत्रावर झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जागांवर याचा परिणाम दिसून येत आहे. याठिकाणी प्रवेश घेण्याऐवजी अनेकांनी स्थानिक महाविद्यालयांनाच प्राधान्य दिले आहे. यामुळे विद्यापीठातील सुमारे ६२ टक्के जागा अद्यापही रिक्त असल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी मराठवाड्याच्या ग्रामीण भागांतून असंख्य विद्यार्थी दरवर्षी येत असतात. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट संपली तरीही तिसऱ्या लाटेच्या भीतीने पालक आपल्या पाल्यांना विद्यापीठात शिक्षणासाठी पाठवण्यास तयार नाहीत. त्यामुळे या वर्षी पदवी आणि पदव्युत्तरचे केवळ ५ हजार ५०० विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली आहे. मागील वर्षी सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.

मागील वर्षीच्या तुलनेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या अडीच पट कमी झाल्याने विद्यापीठातील केवळ ३८ टक्के जागांवरच प्रवेश निश्चित झाले असून अद्याप ६२ टक्के जागा रिक्त आहेत. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांच्या ग्रामीण भागांतून दरवर्षी औरंगाबादच्या विद्यापीठात प्रवेश होत असतात. मात्र कोरोनाच्या धास्तीमुळे ग्रामीम भागातील विद्यार्थी विद्यापीठाऐवजी स्थानिक महाविद्यालयात प्रवेश घेण्याला पसंती देत असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!