Share

‘वादग्रस्त प्रकरणावर टीका करावी पण, व्यक्तिगत आयुष्याला मध्ये ओढू नये’ राऊतांचा मलिकांना अप्रत्यक्ष सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केला आहे. यावरच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीटरला एक फोटो शेअर करत समीर यांच्या पहिल्या लग्नातील फोटो असल्याचा अप्रत्यक्ष दावा केला आणि घोटाळ्याची सुरुवात येथूनच झाली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला होता. आता यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून नवाब मलिक यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरले आहे. लोकशाहीत तो त्यांचा अधिकार आहे, पण अशा वादग्रस्त प्रकरणावर टीका करताना संबंधित अधिकाऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्याला मध्ये ओढू नये हेदेखील खरेच. कठोर टीका करायला काहीच हरकत नाही, पण ती कारवाईपुरतीच मर्यादित राहील हे पाहायला हवे. अर्थात केंद्रातील सत्ताधारी पक्षाला तरी कुठे काही भान राहिले आहे? तो केंद्रीय तपास यंत्रणांचा बेभानपणे वापर करीतच आहे. असे म्हणत त्यांनी केंद्रावरही ताशेरे ओढले आहे.

दरम्यान कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीची कारवाई भ्रष्ट असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. त्यातच आता NCB च्या अज्ञात अधिकाऱ्याकडून नवाब मलिकांना पत्र आले आहे. याबाबतीत मी लवकरच खुलासा करणार असल्याचे त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!