Share

भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य ;’अनियंत्रीत लोकसंख्येसाठी आमिर खानसारखे लोक जबाबदार’

Published On: 

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधत लोकसंख्या धोरण जाहीर केले. यामध्ये परिवार नियोजन करण्यासह अनेक योजना राबाविण्याचा विचार सुरू असून एक मुल झाल्यानंतर नसबंदी केल्यास त्यांना 20 वर्षापर्यंत मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण, विमा, यासोबत शासकीय नोकरित प्राधान्य असे अनेक लाभ या लोकसंख्या धोरणाच्या माध्यमातून देणार असल्याचे या धोरणात म्हटले आहे.

तर तर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी देखील लोकसंख्या नियंत्रणासाठी मोठा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यातच मध्ये प्रदेशातील भाजप खासदार सुधीर गुप्ता यांनी अनियंत्रीत लोकसंख्येसाठी बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्यासारखे लोक जबाबदार असल्याचं म्हटले आहे.

भाजप खासदार गुप्ता यांनी आमिर खानचे नाव घेत म्हटले आहे की, ‘देशाची लोकसंख्या अनियंत्रित कऱण्यासाठी आमिर खान सारख्या लोकांचा हात आहे, हेच दुर्दैव्य आहे. आमिर खान याला पहिल्या पत्नीकडून दोन आपत्य आहे. दुसरी किरण राव आता मुलाला घेऊन कुठं भटकणार, तिची त्याला चिंता नाही. मात्र आता आमिर तिसरीच्या शोधात आहे.’ असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!