🕒 1 min read
नागपूर : भाजपची आध्यात्मिक आघाडी मंदिरे सुरु करण्याची मागणी सातत्याने करताना दिसून येत आहे.भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी आज राज्यव्यापी शंखनाद आंदोलन होणार असल्याची घोषणा आध्यात्मिक आघाडी चे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांच्याकडून शनिवारी करण्यात आली होती. दरम्यान, पुणे,नाशिक,नागपूर येथे भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली असून नेत्यांकडून शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टीका देखील काण्यात येत आहे.
नागपूरमध्ये राज्याचे माजी ऊर्जामंत्री व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे हे या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. यावेळी माध्यमांशी बोलतांना ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अधर्मी’ असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्राचा प्रहार केला आहे.
दरम्यान, अनेकवेळा आंदोलन करून देखील मंदिर खुली न केल्यामुळे शेवटच्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने राज्यभरात भाजपच्या अध्यात्मिक आघाडी तर्फे हे आक्रमक आंदोलन करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- श्रेयस अय्यर पुनरागमनासाठी सज्ज, टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य
- ओव्हल कसोटीतुन ‘हा’ भारतीय दिग्गज खेळाडू होणार संघाबाहेर
- ओव्हल कसोटीसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, ‘या’ दिग्गजाचे झाले पुनरागमन
- ‘ऐसा कैसा चलेगा अनिल?’ ; भाजपच्या नेत्याने परबांवर डागले टीकास्त्र
- पुणे शहरात कोरोनाचे २०७ रुग्ण गंभीर तर २९८ रुग्ण ऑक्सिजनवर


