औरंगाबाद : जिल्हा परिषद शाळांची नवीन बांधकामे, विशेष दुरुस्ती, पुनर्बांधणी, भौतिक सुविधा विविध योजनांतर्गत मंजूर केलेली कामे पूर्ण करण्याची जबाबदरी समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत अभियंत्याकडे सोपविण्यात आली आहे. मात्र अपुऱ्या अभियंता संख्येअभावी ही कामे तात्पुरती स्थगित करावी किंवा मंजूर कामे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून करून घेण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती जिल्हा परिषद शिक्षण सभापती अविनाश गलांडे पाटील यांनी ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात गलांडे पाटील यांनी म्हंटले आहे कि, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या डीपीडीसी वित्त आयोग, क्रीडा योजना, खनिकर्म, सीएसआर फंड, खासदार आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अशा सर्व योजनांतर्गत जिल्हा परिषद शाळांची नवीन बांधकाम, देखभाल दुरुस्ती, संरक्षण भिंत, खेळाचे मैदान, रॅम्प, स्वयंपाकगृह हे सर्व कामे समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत अभियंत्याकडे सोपविण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत.
मात्र, समग्र शिक्षा अंतर्गत आजरोजी प्रत्येक तालुक्यात केवळ एक शाखा अभियंता कार्यरत असून, त्यांच्याकडून विहित कालावधीमध्ये हे काम पूर्ण करणे शक्य होणार नाही. यामुळे शासनाचा निधीचा अपव्यय होतो. त्यामुळे सन २०२०-२१ वर्षी मंजूर असलेली कामे मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणार नाहीत. म्हणून, समग्र शिक्षा अभियानाकडे आवश्यक कर्मचारीसंख्या उपलब्ध होईपर्यंत कामाला स्थगिती देण्यात यावी अशी विनंती सभापती गलांडे यांनी केली आहे.
कार्यक्रमाला स्थगिती द्यावी किंवा २०२१-२२ आर्थिक वर्षांमध्ये मंजूर होणाऱ्या कामांकरिता सदरील शासननिर्णय लागू करावा, तसेच २०२०-२१ वर्षातील मंजूर कामे, कार्यारंभ आदेश देण्यात आलेली कामे व निविदा स्तरावरील कामे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून करून घेण्याचे आदेश द्यावे अशी विनंती गलांडे यांनी निवेदनाद्वारे राज्यमंत्री सत्तार यांच्याकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- रोहित शर्मा सर्वोत्कृष्ट कर्णधार : सूर्यकुमार यादव
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- सूर्यकुमार यादववर नाराज डेव्हिड वॉर्नर ; ट्विट करत म्हणला, ‘मला विश्वास बसत नाहीये’
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- ‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगें’ धोनीसोबत मीही निवृत्ती घेणार, रैनाचं मोठं वक्तव्य


