पुणे : पुण्यातील हिंदुत्ववादी नेते आणि भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांच्या खुनाचा कट उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत भावाचा विजय सोपा व्हावा, यासाठी आरोपीने हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
विकी उर्फ वितुल वामन क्षीरसागर , मनोज संभीजी पाटोळे (रा. सानेगुरूजी नगर, आंबीलओढा कॉलनी), महेश आगलावे (रा. लोहीयानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. याबाबत नगरसेवक धीरज रामचंद्र घाटे (वय ४६, रा. स्नेह नगर, निलायम टॉकीजजवळ) यांनी तक्रार दिली आहे. नवी पेठेतील शेफ्रॉन हॉटेल येथे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे.
धीरज घाटे पुण्यातील कट्टर हिंदुत्ववादी नेते मानले जातात. घाटे यांनी बीडमध्ये चार वर्ष संघाचे प्रचारक म्हणून काम केले आहे. तसेच ते आता पुणे महापालिकेतील कसबा विश्रामबाग वाडा वॉर्ड क्र. 29 मधून भाजपचे नगरसेवक आहेत. धीरज घाटेंना आधी पुणे महापालिकेत सभागृह नेता, नंतर पुणे शहर प्रभारी म्हणून भाजपकडून संधी देखील मिळाली होती. तर मार्च महिन्यात घाटेंची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस (सचिव) पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सत्तेसाठी मराठी माणसाला वाऱ्यावर सोडले, त्यामुळे मराठीचा ठेका आपल्याकडेच आहे या भ्रमातून बाहेर या’
- ‘तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला हे बेळगावलाच नाहीतर अखंड हिंदूस्थानाला समजले आहे’
- एकीची वज्रमूठ सुटली की गद्दारांचं फावतं; राऊतांचे भाजपवर टीकेचे बाण
- ब्राह्मण समजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक
- शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची महत्वाची बैठक सुरु

