Share

एकीची वज्रमूठ सुटली की गद्दारांचं फावतं; राऊतांचे भाजपवर टीकेचे बाण

Published On: 

मुंबई : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व असा विजय मिळवला आहे. भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेसह अन्य पक्षांनी मोठे प्रयत्न केले मात्र भाजपने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत महाराष्ट्र एकीकरण समितीसह सर्वांना अस्मान दाखवले. हा पराभव सेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. खासदार संजय राऊत यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर शरसंधान केले. संजय राऊतांनी याबाबत सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे.

औरंगजेबाने आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अटक केल्याचे वृत्त धडकताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात व चिंतेत बुडाला होता, पण महाराजांच्या अटकेनेही आनंद मानून, गोडधोड वाटणारा एक वर्ग तेव्हाही महाराष्ट्रात होताच. त्याच प्रवृत्तीचे लोक बेळगाव महापालिका निवडणुकीतील मराठी पराभवाचा आनंद साजरा करीत आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर सजकून टीका केली आहे.

मराठीजनांचे शाप आणि हुतात्म्यांचे तळतळाट त्यांना लागतील. सीमा बांधवांचा लढा सुरूच राहील, मराठी एकजूट पुन्हा उसळून समोर येईल! बेळगावच्या पराभवातून एक धडा घ्यावाच लागेल. आपले शत्रू आणि वैरी आपल्याच घरात आहेत. एकीची वज्रमूठ सुटली की गद्दारांचे फावते!, असंही संजय राऊत सामनामध्ये म्हणाले आहेत.

क्रिकेटच्या सामन्यात पाकिस्तान जिंकताच भेंडीबाजारातील काही भागात पूर्वी फटाके फुटत होते. तसलेच दळभद्री कृत्य बेळगावच्या निकालाने घडले आहे, असंही संजय राऊत सामनामधून भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!