Share

‘सत्तेसाठी मराठी माणसाला वाऱ्यावर सोडले, त्यामुळे मराठीचा ठेका आपल्याकडेच आहे या भ्रमातून बाहेर या’

Published On: 

मुंबई – बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व असा विजय मिळवला आहे. भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेसह अन्य पक्षांनी मोठे प्रयत्न केले मात्र भाजपने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत महाराष्ट्र एकीकरण समिती सह सर्वांना अस्मान दाखवले.

बेळगाव महापालिका स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र एकीकरण समितीची अबाधित असणारी सत्ता या निकालानंतर संपुष्टात आली. भाजपने ३५ जागा मिळवत प्रथमच महापालिकेवर  प्रथमच आपला झेंडा लावला आहे. तर आजवर सत्तेत राहणाऱ्या एकीकरण समितीचे या वेळी अवघे चार उमेदवार निवडून आले आहेत. यंदा महाराष्ट्र एकीकरण समितीसह भाजप, काँग्रेस, आप, धर्मनिरपेक्ष जनता दल, एमआयएम यासारखे प्रमुख पक्ष उतरले असल्याने निकाल कसा राहणार याचे कुतूहल होते.

दरम्यान, हा पराभव सेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. खासदार संजय राऊत यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर शरसंधान केले आहे. बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला. मग एक करा.पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा. महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणारया भाजपाने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा! असं म्हणत राऊत यांनी भाजपला डिवचले आहे.

राऊत यांच्या या आवाहनाला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी  जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात विश्वासघाताने सत्ता मिळवून दोन वर्ष होतील. औरंगाबादच संभाजी नगर झाले नाही कधी होणार? शेतकऱ्याला बांधावर मदत देऊ म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ती मदत अजून नाही मिळाली. सत्तेसाठी मराठी माणसाला कधीच वाऱ्यावर सोडले आहे त्यामुळे मराठीचा ठेका आपल्याला या भ्रमातून बाहेर या असा मार्मिक टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!