Share

राष्ट्रवादी काँग्रेसने पाडलं वंचित बहुजन आघाडीला खिंडार!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २०१४ नंतर राज्यासह देशात भाजपचं सरकार आलं आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये उडी घेतली होती. आता, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर भाजपमधून आऊटगोईंग सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला देखील खिंडार पाडलं आहे.

वंचित बहुजन आघाडीतील गणेश जाधव, सुधीर आंब्रे, ज्योती कांबळे, प्रकाश यादव, दीपक तांबे, रेखा मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेश केलेले कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सामाजिक न्याय विभागात काम करणार आहेत.

यासोबतच, चांदणी मुन्नी अन्सारी यांनी पक्षाच्या एलजिबीटी सेलमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष सुनील शिंदे, मुंबई विभागीय युवती अध्यक्ष अदिती नलावडे, माजी नगरसेवक अजित रावराणे, सामाजिक न्याय विभाग मुंबई निरीक्षक जोतिराम सोनवणे उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!