🕒 1 min read
औरंंगाबाद : याचिकाकर्ता अनिकेत कोठावळेकडून शैक्षणिक शुल्क वसुलीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. तसेच त्याचे इंटर्नशिप सर्टिफिकेट अडवू नये, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश एस. व्ही.गंगापूरवाला आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी नुकतेच दिले आहेत.
अनिकेत मूळचा उस्मानाबादचा रहिवासी आहे. त्याचे वडील माध्यमिक शिक्षक होते. १९ ऑगस्ट १९९५ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांंच्या पाल्यांना पहिली ते पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण नि:शुल्क देण्याचा निर्णय होता. या निर्णयाची माहिती नसल्यामुळे अनिकेतने लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षासाठी नियमाप्रमाणे पूर्ण शुल्क भरून प्रवेश घेतला होता. दुस-या वर्षापासून अंतिम वर्षापर्यंत १९९५ च्या शासन निर्णयानुसार त्याला शैक्षणिक शुल्क भरण्यास सवलत मिळाली होती. २०२० मध्ये एमबीबीएस पूर्ण करून औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्याने २०२१ मध्ये इंटर्नशिप पूर्ण केली आहे.
दरम्यान, १६ मार्च २०२१ रोजी शासनाने नवीन निर्णय देऊन १९ ऑगस्ट १९९५ च्या शासन निर्णयात सुधारणा केली. नि:शुल्क ऐवजी विहित दराने शैक्षणिक शुल्क घेण्याचे धोरण निश्चित केले. या नवीन धोरणानुसार विद्याथ्र्यांना दरवर्षी ६ हजार रुपये सवलत जाहीर केली होती. त्यामुळे मागील पूर्ण फी भरल्याशिवाय आंतरवासिता कालावधी पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देता येणार नाही, असे अनिकेतला कळवण्यात आले. त्यामुळे त्याने अ;ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याने अभ्यासक्रम आणि आंतरवासिता कालावधी पूर्ण केल्यामुळे नवीन शासन निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही.
तसेच पूर्वीच्या शासन निर्णयामुळे याचिकाकत्र्याला दिलेले लाभ वसूल करता येणार नाहीत. त्याला नवीन शासन निर्णय लागू होत नाही. त्याला तत्काळ इंटर्नशिप सर्टिफिकेट देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती अ;ॅड. ठोंबरे यांनी केली. शिवाय ३० एप्रिल रोजी आंतरवासिता प्रमाणपत्र सादर करून डॉक्टर म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी बंधपत्र देण्याची शेवटची तारीख असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवा; शिवसेना खासदाराची मागणी
- लोकांना भेटायला मी काय सरपंच आहे का ?, शिवसेना खासदाराचे बेताल वक्तव्य !
- ‘गडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती, तर ही वेळ आलीच नसती’
- ‘बंगाल जिंकण्याच्या आग्रहामुळे देश उद्ध्वस्त’, ममतांचा मोदींवर हल्लाबोल
- पंढरपूरचं मैदान मारल्यानंतर आवताडे, परिचारक फडणवीसांच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
