Share

केंद्राला दिलासा! ‘सेंट्रल व्हिस्टा’च्या कामावरील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली!

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाच्या काळातही दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टाचे बांधकाम सुरू आहे. प्रकल्पाच्या किंमत तसेच बांधकामाला कोरोना काळात देखील विशेष परवानगी देण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर विरोधकांनी आक्षेप घेतले होते. देशात यावरून राजकारण सुरू असताना एकाने सेंट्रल व्हिस्टा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयापर्यंत याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने या प्रकरणावर सुनावणी घेण्यास नकार देत ही याचिका फेटाळून लावली. दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणावरची याचिका प्रलंबित असताना इथे सुनावणी घेता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले.

याचिकाकर्त्यांनी म्हटले होते की, हे बांधकाम अत्यावश्यक श्रेणीत कसं येऊ शकतं? देशातील आरोग्यविषयक आणीबाणीमध्ये आपण मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांचे प्राण धोक्यात घालू शकत नाही. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढेल. या बांधकामासाठी मजूर किर्ती नगर, सरायकाला खान परिसरातून येत असल्याचं आपल्याला समजले आहे. सध्या दिल्लीत ८ ठिकाणी बांधकामं सुरू असून सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी राजपथ, सेंट्रल व्हिस्टा आणि बगीचा परिसरात होणाऱ्या बांधकामावर प्राधान्याने आक्षेप घेण्यात आला होता.

अशाच प्रकारची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात देखील अगोदरच दाखल आहे. त्याची सुनावणी १७ मे रोजी आहे. ‘हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयासमोर प्रलंबित असताना आणि कामावर फक्त स्थगिती आणण्याची मागणी याचिकेत केली असताना आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करू शकत नाही असं आमचं मत आहे. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाला सुनावणी लवकरात लवकर घेण्याची विनंती करण्याची विनंती आम्ही याचिकाकर्त्यांना करतो”, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!