Share

संजय राऊतांना मोठा दिलासा, महिलेची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर विविध आरोप करत दाखल केलेली एका ३९ वर्षीय महिलेची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना एक प्रकारे क्लिन चिट मिळाल्याचे मानले जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप करत या महिलेने म्हटले की, संजय राऊत यांच्या सांगण्यावरुन पाठीमागील सात वर्षांपासून आपला छळ सुरु आहे. न्यायालयाने या महिलेची याचिका फेटाळून लावली आहे

एका महिलेने संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला होता. एका व्यक्तिच्या माध्यमातून राऊत यांनी आपला छळ केल्याचं या महिलेने म्हटलं होतं. राऊत यांनी आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी माणसं ठेवली होती. हेरगिरी करणं, शिवीगाळ करणं, धमक्या देणं आणि जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणं आदी आरोप या महिलेने राऊत यांच्यावर केले होते. २०१३ पासून आपला छळ सुरू असल्याचा दावा या महिलेने याचिकेत केला होता.

या महिलेने याबाबत पोलिसात एक तक्रारही दिली होती. तक्रार देऊनही पोलिसांनी गुन्हा नोंदवला नसल्याचे या महिलेने सांगितले होते. तसेच या प्रकरणात पोलिसांनाही प्रतिवादी करण्यात आले होते. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा दावाही करण्यात आला होता. पण आता हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावल्याने राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!