पुणे : राज्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईत देखील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. दरम्यान, आता राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून रुग्ण संख्येत घट होत असून कोरोनामुक्तांचा आकडा वाढत आहे. पुणे शहरात सलग आठव्या दिवशी कोरोनामुक्तांचा आकडा हा कोरोना बाधितांपेक्षा अधिक आहे. तर, नव्या कोरोना रुग्णांच्या आकड्यामध्ये देखील मोठी घट झाली आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात गेल्या २४ तासांमध्ये २ हजार ५३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, ४ हजार ३५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या महिन्यापासून रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत होती. मात्र, आता नव्या कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये मोठी घट होत आहे. दरम्यान, ५६ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
#दिलासादायक : सलग आठ दिवस नव्या रुग्णसंख्येत घट; कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक !
दिनांक/कोरोनामुक्त/नवे रुग्ण
२६ एप्रिल/४३५१/२५३८
२५ एप्रिल/४७५९/४६३१
२४ एप्रिल/४७८९/३९९१
२३ एप्रिल/५६३४/४४६५
२२ एप्रिल/४८५१/४५३९
२१ एप्रिल/६५३०/५५२९
२० एप्रिल/६८०२/५१३८
१९ एप्रिल/६४७३/४५८७— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 26, 2021
तर, शहरात लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अशातच, राज्य सरकारने कडक लॉकडाऊन लागू केल्यामुळे शहरातील बाधितांची संख्या कमी होण्यास अधिक वेग येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशीच रुग्णसंख्या घटत राहिल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे ‘आता नको कोणतीही ढिलाई, बाकी आहे मोठी लढाई !’ असं आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरून अमरावतीची बदनामी करू नका, आरोग्य विभागाचे आवाहन
- घर का भेदी..! युवतीने मित्राच्या मदतीने घरातून चोरले २० तोळे सोने
- ‘भारताने हायड्रोक्सिक्लोरोक्विन दिले, आपण लस देऊत’, जो बायडेनवर नागरिकांचा दबाव
- होम आयसोलेशन बंद करून सक्तीचे विलगीकरण करा, मंत्री थोरात यांच्या सुचना
- काही पण होऊ द्या, केंद्राकडे बोट दाखवणे हीच ठाकरे सरकारची ओळख’ : रावसाहेब दानवेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

