औरंगाबाद : अग्निशमन विभागाला अत्यावश्यक सेवेसाठी देण्यात आलेली तीन वाहने महापालिका मुख्यालयातील अधिकार्यांनी पळवली आहेत. मात्र यामुळे अग्निशमन विभागाला अनेक कामांमध्ये अडचणी येत आहेत. मध्यंतरी या विभागाला वाहने परत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आरोग्य विभागाची जीप अग्निशमन विभागाला परत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पालिका मुख्यालयाप्रमाणेच मागील काही वर्षांपासून अग्निशमन विभागातील रिक्त पदांचीही भरती झालेली नाही. परिणामी, रिक्त पदे आणि नव्याने भरती होत नसल्याने या विभागाचे कामकाज सध्या कंत्राटी कर्मचार्यांवरच सुरू आहे. शहर व परिसरात आगीची घटना घटल्यास अपुर्या यंत्रणेवर जिवाची पर्वा न करता जवान आगी आटोक्यात आणत आहेत. हा विभाग सक्षम करण्याची गरज असताना दुसरीकडे या विभागाकडे असलेली वाहने काढून पालिका अधिकार्यांना वापरण्यास दिली जात आहेत.
या विभागाकडे दोन इनोव्हा गाड्या आहेत. यातील एक कार आयुक्त वापरतात. तर दुसरी इनोव्हा कार एका उपायुक्ताला दिलेली आहे. एक बुलोरो जीप कंत्राटी पद्धतीने पालिकेत घेतलेले विशेष वसुली अधिकारी वापरतात. त्यामुळे सध्या अग्निशमन विभागासाठी चांगल्या अवस्थेत असलेली एकच जीप आहे. या जीपचेही काही काम निघाल्यास अन्य वाहन नसल्याने अधिकार्यांची अडचण होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या प्रशासकीय कारभार सुरू असल्याने अधिकार्यांची मनमानी सुरू असल्याचे दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शहरासाठी २१८ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी उपाय योजना करा, खंडपीठाचे निर्देश
- कोरोना नंतर म्युकरमायकोसीस आजार; प्रत्येक रुग्णाचा जीव वाचवण्याचा दृष्टीकोन हवा- आ. निलंगेकर
- कोरोना नंतर म्युकरमायकोसीस आजार; प्रत्येक रुग्णाचा जीव वाचवण्याचा दृष्टीकोन हवा- आ. निलंगेकर
- चक्रीवादळाचे रौद्ररूप : केरळातील अनेक घरे जमीनदोस्त, कोकणात समुद्र खवळला
- ‘म्युकरमायकोसिस’चा लातुरात शिरकाव; ५ रुग्ण आढळले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

