मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून सभागृहात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला होता. त्यांनतर सत्ताधारी व विरोधी पक्षाचे आमदार आमनेसामने देखील आले. तर, अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं.
दरम्यान आता 12 निलंबित आमदारांबाबत भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. या निलंबित आमदारांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोगाकडून भाजपच्या या 12 आमदारांना दिलासा देण्यात आलाय. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात गैरवर्तनाचं कारण देत भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता राज्यसभा निवडणुकीत या आमदारांना मतदान करण्याची परवानगी असणार आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा दिलासा मानला जात आहे.
कोण आहेत भाजपचे १२ निलंबित आमदार :
अतुल भातखळकर, राम सातपुते, आशिष शेलार, संजय कुटे, योगेश सागर, किर्तीकुमार बागडिया, गिरीश महाजन, जयकुमार रावल, अभिमन्यू पवार, पराग अळवणी, नारायण कुचे, हरीश पिंपळे या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या
- राज्यपालांनी विरोधकांचे थोबाड फोडलं पाहिजे, पण ते उत्तेजन देतात; राऊतांचा हल्लाबोल
- ‘कोरोना हा आपल्या जन्माच्या अगोदर पासून होता, आहे आणि असाच राहणार’
- स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या माधवराव देवसरकरांविरोधात पदाधिकऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा आरोप
- ‘नीट’ रद्द करण्याचा विचार नाही; सामंत यांचे स्पष्टीकरण
- चित्रा वाघ यांनी जाळले मुख्यमंत्र्यांचे पत्र; म्हणाल्या, हे पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव

