Share

औरंगाबादला दिलासा; दुबईहून आलेल्या ओमायक्रोनबाधित तरुणाचे नातेवाईक निगेटिव्ह..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबादः औरंगाबादेत ओमायक्रोनबाधित दोन रुग्ण आढळल्याने प्रशासन हाय अलर्टवर गेले आहे. या दोघांमध्ये एक गृहस्थ इंग्लंड वरून आलेला आहे तर दुसरा दुबईवरून. इंग्लंड वरून आलेल्या गृहस्थाची मुलगी आधीच ओमायक्रोनबाधित असल्याने ती मुंबईत उपचार घेत आहे. आणि त्यानंतर औरंगाबादेत आल्यावर सदर गृहस्थाचा अहवाल ओमायक्रोन बाधित आल्याचे समोर आले आहे. दुबईतून आलेल्या गृहस्थाच्या घरातील सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाचा जीव आता भांड्यात पडला आहे.

दुबईहून शहरात आलेल्या ३३ वर्षीय तरुणाच्या कुटुंबातील तिघांचे अहवाल रविवारी निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहराला तूर्तास दिलासा मिळाला आहे, अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. दुबईहून आलेला तरुण शनिवारी ओमायक्रोन पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला मेल्ट्रॉन रुग्णालयात हलवले. त्यानंतर त्याच्या तीन नातेवाईकांची तपासणी केली. त्यांचे अहवाल सध्या निगेटिव्ह आले आहेत.

मात्र प्रोटोकॉलनुसार ७ दिवसानंतर पुन्हा या सर्वांची टेस्ट केली जाणार असून, तोपर्यंत धोका कायम राहणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सात दिवसानंतर या सर्वांचा अहवाल काय येतो त्यावर शहराची पुढील वाटचाल ठरेल. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ओमायक्रोनचे प्रमाण कोरोना सारखेच वाढत जाणार आहे. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केल्यास समारंभांवर निर्बंध आणले तर तो पसरणार नाही. महानगरपालिकेला विदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकाची कोरोना तपासणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!