औरंगाबाद : नवीन जलयोजनेच्या कामात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अडथळे आले होते. मात्र आता मागील काही दिवसांपासून हळूहळू या कामांनी वेग घेतला आहे. डीपीआरनुसार शहरासाठी २०५२ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरुन एमबीआर बांधले जात आहेत. त्यामुळे दोन वेगवेगळे एमबीआर नियोजित असून ग्राऊंड स्तरावर ५० लाख लिटर क्षमतेचा तर दुसरा मोठा एमबीआर नक्षत्रवाडीच्या टेकडीवर तयार करण्यात येत असून त्याची क्षमता ११० लाख लिटर एवढी आहे. सध्यस्थितीत पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे.
राज्य सरकारने औरंगाबाद शहरासाठी मंजूर केलेल्याकेलेल्या १६८० कोटी रुपयांच्या नवीन जलवाहिनीचे काम सुरू आहे. यात प्राधान्याने रस्त्यांना बाधीत होत असलेल्या जलवाहिनीचे काम आधी पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे रस्त्याच्या कामातील अडथळा दूर झाला आहे. सोबतच आता नऊ पैकी सहा जलकुंभाच्या कामांनाही गती देण्यात आली आहे.
शहराला शुद्धिकरण पाणी देण्यासाठी नवीन जलवाहिनीच्या डीपीआरनुसार नक्षत्रवाडी येथे ग्राऊंड लेव्हल आणि डोंगरावर असे दोन एमबीआर उभारले जाणार आहे. शहरातील हर्सुल जलशुद्धीकरण केंद्र, गरवारे स्टेडिअम, दिल्लीगेट, शिवाजी मैदान एन २, टिव्ही सेंटर येथे दोन, पारिजातनगर, केटली गार्डन, हिमायत बाग असे नऊ नवीन जलकुंभ उभारले जाणार आहे.
दरम्यान, शहरातील जलवाहिनीचे सर्वेक्षण पुर्णत्वास येत असून मुख्य जलवाहिनीच्या कामांचा सर्वेही पूर्ण झाला आहे. त्यामुळे नक्षत्रवाडी येथे दोन मोठ्या साठवण टाक्या (एमबीआर) तयार केल्या जात आहेत. येथूनच शहराला पाणी पुरवठा होणार आहे. त्यापैकी एका साठवण टाकीचे काम हाती घेतले आहे. सध्या पाया भरणीचे काम आटोपत आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मृणाल कुलकर्णी यांच्या सुनेविषयी ‘या’ आहेत अपेक्षा
- लोककलावंतांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन सकारात्मक – अमित देशमुख
- सोनू निगम संताप व्यक्त करत सोशल मिडियावर नको ते बडबडला…
- ‘सरकार लोककलावंतांच्या पाठिशी, अर्थसहाय्य प्रस्ताव तयार करणार’
- वेळेवर पगार होण्यासाठी शिक्षकांनी लढवली ‘हि’ शक्कल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

