Share

सोनू निगम संताप व्यक्त करत सोशल मिडियावर नको ते बडबडला…

Published On: 

मुंबई : देशात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यातच रक्ताचा तुटवडा देखील जाणवत असल्यामुळे रक्तदान करण्याची मोहीम राबविली जात आहे. अनेकजन रक्तदान करण्यासाठी पुढे येत आहेत. काहीच दिवसांपूर्वी गायक सोनू निगम याने केले. रक्तदान करतानाचा फोटो शेअर करत्याने याची माहिती दिली होती. तसेच कोरोना लस घेण्याअगोदर रक्तदान ही करा, असे आवाहन देखील त्याने केले होते. मात्र सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केल्यानंतर देखील त्याला ट्रोल करण्यात आले. त्याला ट्रोल करण्याचे कारण म्हणजे रक्तदान करताना त्याने मास्कचा वापर केला नव्हता. पण या ट्रोलिंगमुळे सोनू आता प्रचंड संतापला आहे.

यावेळी त्याने ट्रोलर्सला म्हणाला की, ‘सोशल मीडियावर आइंस्टाइन बनून फिरणा-यांनो मला तुमच्याच भाषेत उत्तर देऊ द्या. कारण तुम्ही त्याच लायकीचे आहात. साले गधों, उल्लू के पट्ठों… रक्तदान करताना मास्क लावण्यावी परवानगी नसते. आणखी किती खालच्या दर्जाला जाणार आहात साले लेफ्टिस्ट?’, असे सोनू निगमने ट्रोलर्सला सुनावले आहे.

सोनू निगम अलीकडे मुंबईतल्या जुहू येथे आदर्श फाऊंडेशन तर्फे आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यासाठी गेला होता. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन केल्यानंतर त्याने स्वत: रक्तदानही केले होते. परंतु मास्क न लावल्यामुळे त्याला कुणीतरी याला मास्क दान करा, असे म्हणत लोकांनी ट्रोल केले होत. यावरच आता त्याने काही दिवसांनंतर का होईना आपली संताप व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!