Share

वेळेवर पगार होण्यासाठी शिक्षकांनी लढवली ‘हि’ शक्कल!

Published On: 

औरंगाबाद : गेल्या वर्षभरापासून शिक्षकांचे पगार नेहमीच अनियमित होत आहेत. दोन-दोन महिने पगार उशिरा होत असल्यामुळे शिक्षकांना प्रचंड आर्थिक बोजा सहन करावा लागतो. बँकांचे कर्ज, पतसंस्थांचे हप्ते, मुलांचे शिक्षण, आजारपण अशा अनेक संकटांचा सामना शिक्षक गेल्या वर्षभरापासून करत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी आजपासून ऑनलाईन आंदोलन सुरू केले आहे. हातात पगार करा हा मजकूर लिहिलेले पोस्टर घेऊन हे फोटो सर्वच राजकीय नेत्यांना पाठवत आहेत. ही अजबच शक्कल शिक्षकांनी लढवली आहे.

जिल्हाभरातील सर्व संघटनांनी अनेक वेळा जिल्हा प्रशासनाला पगार सीएमपी प्रणालीद्वारे करा अशी मागणी केली परंतु जिल्हा परिषदेचे प्रशासन गांभीर्याने घेत नाही शिक्षकांच्या अडचणी समजून घेत नाही आणि सध्या कोविड परिस्थिती असल्यामुळे संघटनाचे प्रतिनिधी जिल्हा परिषद मध्ये जास्त वेळ जात नाही प्रशासनाने त्याचा फायदा घेतला. त्यामुळे आणखीनच पगार उशिरा व्हायला लागली तेव्हा शिक्षकांचे पगार एक तारखेला झाली पाहिजे यासाठी एक अनोखे आंदोलन जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांनी एकत्र येऊन करण्याचा निर्णय घेतला.

ऑनलाईन आंदोलन या आंदोलनात प्रत्येक शिक्षकांनी आपल्या घरीच राहून पगार एक तारखेला करा पगार सीसीएमपी द्वारे करा असे पोस्टर वर लिहून फोटो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून पासून तर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांच्यापर्यंत सर्वांना रोज २०० फोटो पाठवायचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची सुरुवात आज १० मे पासून करण्यात आली आहे हे आंदोलन कोणत्याही संघटनेच्या बॅनरखाली नसून शिक्षकांच्या हितासाठी सर्व शिक्षकांच्या नेतृत्वाखाली संघटना विरहित आंदोलन केले जाणार आहे असे विजय साळकर, दीपक पवार, कैलास गायकवाड, श्रीराम बोचरे आदींनी कळवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!