Share

मृणाल कुलकर्णी यांच्या सुनेविषयी ‘या’ आहेत अपेक्षा

Published On: 

मुंबई: सध्या झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘माझा होशील ना’ या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता आदित्य अर्थात विराजस कुलकर्णी कमी काळात प्रचंड लोकप्रिय झाला. तर अभिनेत्री गौतमी देशपांडे साकारत असलेले सई हे पात्र देखील लोकप्रिय ठरल आहे. या मालिकेतील सई आणि आदित्य ही जोडी प्रेक्षकांना विशेष आवडत आहे.

विराजसची आई म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या सुनेविषयी विराजस समोर त्यांच्या अटी मांडल्या आहेत. याबाबत मृणाल म्हणाल्या की, “मुलीने मला चालून दाखवावं म्हणजे ती लंगडी आहे की नाही मला कळेल, तिने मला तांदूळ निवडून दाखवावेत म्हणजे तिची दृष्टी कशी आहे कळेल. तिने गाणं म्हणून दाखवावं.” असे गंमत करत त्यांनी उत्तर दिले.

पुढे त्या म्हणाल्या की, “माझ्या सूनेबद्दल काहीही अपेक्षा नाहीत. विराजसला पूरक अशी, त्याला हवी तशी मैत्रिण त्याला मिळावी आणि ही मैत्रिण आमच्या घरात सून म्हणून यावी, अशी आमची माफक अपेक्षा आहे. आयुष्य त्याचे आहे आणि मुलगी निवडण्याचा अधिकारही त्याचा आहे. तो जो काही निर्णय घेईल, त्यात आम्ही आनंदी असू. विराजसची पसंत तीच माझी पसंत”, अस त्या यावेळी म्हणाल्या. मृणाल कुलकर्णी यांनी याने हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केल आहे. त्या देखील एक उत्तम कलाकार आहे. त्या मूळच्या पुण्याची असून गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीमध्ये अभिनय करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!