मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप वर्षभराचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. आता, भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
राजकीय पक्षांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी कंबर कसल्याने राजकीय वातावरण देखील तापत आहे. अशातच काँग्रेसचे नेते व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दोन महापालिका आयुक्तांच्या नेमणुकीची मागणी केली आहे.
पालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरिकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहतात. शिवाय मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पालिका मुख्यालयात यावे लागते. नागरिकांची होणारी ही गैरसोय पाहता मुंबई शहर व उपनगरासाठी दोन महापालिका आयुक्त असणं गरजेचं आहे, अशी मागणी अस्लम शेख यांनी केली आहे.
अस्लम शेख यांच्या मागणीवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. ‘मुंबईसाठी दोन आयुक्त नेमून त्यामाध्यमातून मुंबईचे विभाजन करण्याचा काँग्रेसचा डाव आहे. पण त्यांची ही खेळी भाजप कधीच यशस्वी होऊ देणार नाही. गेल्या वर्षी काँग्रेसच्या नसीम खान यांनी हीच मागणी केली होती. भाजपा हा डाव ताकदीने हाणून पाडेल…’ असा इशाराच त्यांनी दिला आहे.
मुंबईला दोन महापालिका आयुक्त नेमण्याची मागणी हा तर मुंबईच्या विभाजनाचा डाव…
मुंबई पालक मंत्री अस्लम शेख मागील दाराने मुंबईच्या विभाजन करण्याची खेळी खेळतायत. गेल्या वर्षी काँग्रेसच्या नसीम खान यांनी हीच मागणी केली होती. भाजपा हा डाव ताकदीने हाणून पाडेल… pic.twitter.com/myITvhYcJf— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 9, 2021
महत्वाच्या बातम्या
- संभाजी महाराजांच्या नावाचा फलक फाडणाऱ्याला तात्काळ अटक करा – सचिन खरात
- महाराष्ट्र कोरोना लसीकरणासाठी सज्ज, राजेश टोपेंनी दिली लसीकरणाबाबत माहिती
- सामना किंवा सोशल मीडियात संभाजीनगर लिहून नाव बदलत नाही; विनायक मेटेंची शिवसेनेवर टीका!
- ‘अशोक चव्हाणांमुळे मराठा समाजावर वाईट वेळ’
- उदयनराजेंनी काल उदघाटन केलेल्या छत्रपती संभाजी महाराज मार्गाचा फलक अज्ञातांनी फाडला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

