Share

महाराष्ट्र कोरोना लसीकरणासाठी सज्ज, राजेश टोपेंनी दिली लसीकरणाबाबत माहिती

Published On: 

मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आलेली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. या वर्षाच्या सुरुवातीलाच या दोन्ही लशींना मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष लसीकरणाला कधी सुरुवात होणार याकडं सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.

ही प्रतीक्षा संपली असून आता पुढील आठवड्यात लसीकरणाला प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. येत्या 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. दोन टप्प्यात ड्राय रन चाचणी पार पडल्यानंतर आता ही लसीकरण मोहीम सुरु होणार आहे.

तर राज्यातील कोरोना लसीकरण मोहिमेबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. ‘राज्यात कोरोना लसीकरणाची संपूर्ण तयारी झाली आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात 8 लाख आरोग्य सेवकांना लस देऊ. ज्या क्षणाला केंद्र सरकार लसीची उपलब्धता करून देईल. त्यानंतर लगेचच आम्ही लसीकरण सुरु करु. यासाठी कोल्ड चेन ही तयार आहे. काही कमतरता असेल तर ती दूर करु,’ असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, देशभरात कोरोनाची लस सर्वात आधी डॉक्टर, नर्स यासारखे आरोग्य कर्मचारी, सैनिक यांच्यासारख्या कोरोना योद्धांना दिली जाणार आहे. त्यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात संपूर्ण देशात 3 कोटी नागरिकांचं लसीकरण होणार आहे. मुंबई, कर्नाल, चेन्नई आणि कोलकातामध्ये या चार प्रमुख ठिकाणांवर कोरोना लसीकरणाचा साठा केला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!