औरंगाबाद : मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मराठा आरक्षणाबाबतीत सगळीकडे अपयशी ठरले आहेत. त्यांच्यामुळे मराठा समाजावर वाईट वेळ आल्याचा आरोप शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी केला. औरंगाबादेत शिवसंग्राम संघटनेची राज्य कार्यकारणीची बैठक संपन्न झाली. यावेळी आ. मेटे यांनी मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकावर जोरदार हल्लाबोल केला.
ते म्हणाले, अशोक चव्हाण आल्यापासून मराठा आरक्षणाबाबत एकही सुनावणी मराठा समाजाच्या बाजूने झाली नाही. त्यांच्या अकर्तृत्वानपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चव्हाण यांना बोलावले नाही. त्यांच्याही लक्षात आले हे अकार्यक्षम आहेत. पण सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्री त्यांना काढू शकत नाहीत. अशोक चव्हाण यांना किंमतच दिली नाही. त्यामुळे ते माझ्याविरोधात बातम्या पेरत असल्याचा आरोप मेटे यांनी केला.
केंद्र सरकारने याचिका दाखल करुन मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली होती. यावरूनही मेटे यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. हे केंद्राने करायचे तर मग तुम्ही काय खुर्च्या उबवता का? असा सवाल मेटे यांनी अशोक चव्हाण यांना केला.
महत्वाच्या बातम्या
- महाविद्यालयेही सुरु होणार ? उदय सामंत यांनी दिली महत्वाची माहिती
- बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला संभाजीनगरवर शिक्कामोर्तब कराच! खैरेंची मागणी
- ‘युतीत होता म्हणून शिवसेनेचा महापौर व्हायचा आता मात्र सगळीकडे भाजपचाच महापौर होणार’
- ‘आजही केली काय…’भारतीचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले
- ‘भंडारा घटनेतल्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबांना दहा लाखांची मदत दया’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

